मुंबई : मनोज जरांगेंनी आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती सरकारकडून देण्यात आली. ‘Kunbi records search campaign launched in Hyderabad, Telangana; Manoj Jarange’s displeasure with officials कुणबी नोंदी तपासण्याचे 85 % काम पूर्ण झाले, मागासवर्गीय आयोगाच्या कामासाठी जिल्ह्याजिल्ह्यात कक्ष स्थापन करण्यात येतील, तेलंगणामध्ये नोंदीचा शोध घेतला जाईन, पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती यावेळी सरकारकडून देण्यात आली.
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मनोज जरांगेंनी सरकारने त्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली. मराठवाड्यातील बहुतांश गावात तपासणी झाली नाही, अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केले नाही, शिंदे समिती काम करते मात्र अधिकारी जातीवाद का करतात? नोंदी तपासल्या नाहीत तर प्रमाणपत्र कसे देणार? असा सवालही यावेळी बोलताना जरांगेंनी उपस्थित केला. याबरोबरच कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.
मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी आरक्षणासाठी आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती देत सरकारकडून मनोज जरांगेंना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. पण बैठकीनंतर आपण मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी आहेत, 20 जानेवारीच्या आधी मराठ्यांना आरक्षण दिले तर बैठकीचे फलित कळेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले. 20 तारखेला मुंबईच्या दिशेनं निघणारा मराठा मोर्चा अडवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या घरांना वेढा घालू, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. 20 तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या, असं सांगतानाच मोर्चा अडवल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील, असं जरांगेंनी बजावलं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे. अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. शिंदे समितीने आता पर्यंत ज्या नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मनोज जरांगेंच्या जरांगे कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. एवढंच नव्हे तर जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली, त्या अंतरवाली सराटी गावातच एकही कुणबी नोंद न्या. शिंदे समितीला आढळली नाही, अशी माहिती समोर आलीय. न्या. शिंदे समितीनं राज्यभरातून हजारो कुणबी नोंदी शोधून काढल्या.. मात्र जरांगेंच्या गावातच समितीला एकही नोंद आढळली नाही. त्यामुळं मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहण्याची चिन्हं आहेत.
आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासंदर्भात उपमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र कायदेशीर बाबी तपासूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणंय. तर दुसरीकडे असा निर्णय घेतल्यास त्याचे पडसाद एससी आणि एसटी जातीतही उमटतील आणि हे त्या जातींनाही मान्य आहे ? असे प्रश्न ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केले होते.