• मधला मारुती ते कौतम चौक वातावरण तंग
• पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात
सोलापूर : सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या कार्यक्रमा दरम्यान आज काही दुकानांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. यात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. Rioting: Stone pelting on shops during Hindu Jan Awach Morcha in Solapur तर या प्रकरणी पोलीसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यक्रमाला नितेश राणे, टी. राजा सिंग हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमातील भाषणादरम्यान कोणी वादग्रस्त विधान केले का? याचा पोलीस तपास करणार आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी दुपारी आपल्या विविध मागण्याकरिता काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात किरकोळ दगडफेकीची घटना घडलीय. ही घटना आणि हुल्लडबाजीमुळं टिळक चौक ते कौतम चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, काही समाजकंटक तरुणांनी दगडफेक केली तर काही ठिकाणी सोडाच्या बाटल्या फेकण्याची दिसून आले, परंतु पोलीस प्रशासनाच्या तगडा बंदोबस्त अन् समयसूचकता परिस्थिती निवळण्यास महत्त्वपूर्ण ठरलीय.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणाचे आमदार राजा सिंह ठाकूर यांच्यासह आमदार नितेश राणे, मोर्चा समन्वयक सुधीर भैरवाडेसह हिंदू जन आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कन्ना चौकाकडे मार्गस्थ झाला. मोर्चात सहभागी झालेले युवक ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत होते, तसेच पाकिस्तानच्या विरोधातील घोषणा देत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सायंकाळी साडेसहा-पावणे सातच्या सुमारास हा मोर्चा मार्गावरील टिळक चौक येथे आला. त्यावेळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. याठिकाणी आल्यानंतर मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. मधला मारुती ते कौतम चौक दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने एका समुदायाची दुकाने आहेत. त्यामुळे तरुणांना अधिकच जोश आला. यातच काही जणांनी दुकानावर दगड फेकून तर काहींनी सोडाच्या बाटल्या फेकल्या गेल्याचे सांगण्यात आले, पण नेमके हे दगड आणि सोडाच्या बाटल्या कुठून आले हे मात्र समजू शकले नाही.
पुढील अनर्थ घडू नये, म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. मोर्चातला बराचसा भाग हा कन्ना चौकापर्यंत पोहोचलेला असताना शेवटच्या टोकाला असलेल्या काही युवकांनी हा गोंधळ केल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. फौजदार चावडी पोलीस व जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतल्याने हुल्लडबाजी कमी झाली. गोंधळ करणाऱ्या युवकांना पुढे हुसकावून लावण्यात आले. आणि मोर्चा पुढे मार्गस्थ झाला. काही वेळानी सारे काही शांत झाल्यानंतर सायंकाळी साडेसात नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली.
शहर पोलीस वाहतूक शाखेने मधला मारुती ते कोंतम चौक दरम्यानचा रस्ता वहातुकीस बंद केला गेला होता. फौजदार चावडी पोलीस ठाणे तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक चौक ते कन्ना चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सध्या संबंधित ठिकाणी परिस्थिती शांततेत असून, कोणालाही ताब्यात न घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय.