नाशिक, 2 ऑगस्ट, (हिं.स.) – 80 कोटी रुपयांच्या विकास निधीचे वाटप सर्व 31 प्रभागांत समन्याय पद्धतीने करून विकास कामे मंजूर करावेत आग्रही मागणी शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. चुकीच्या पद्धतीने निधीचे वितरण झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
विकास निधीचे वाटप करताना ठराविक नगरसेवकांना देण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे.असा भेदभाव करणे शहर विकासाच्या दृष्टीने निश्चितच उचित नाही.त्यास आमचा प्रखर विरोध राहील.एकतर्फी पद्धतीने मंजूर केलेले सर्व प्रस्ताव त्वरित रद्द करावेत व समान न्यायाने प्रत्येक प्रभागासाठी समान निधी वितरित, करावा,अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे.तसे न झाल्यास आयुक्त कार्यालयात कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागेल, इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, काही प्रभागात मंजूर करण्यात आलेला निधी रद्द करून समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल,असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले.