पंढरपूर /प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी केलेल्या मागणीनुसार मोहोळ तालुक्यातील येवती येथील चार रस्त्यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यांचे कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानंद रस्ते मधून रस्ते मंजूर करण्यात आले आहेत.
या मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये येवती येथील नेताजी भोंगाळे शेत ते तुंगत नाला रोड २० लाख, आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी भोंगळे शेत रस्ता२० लाख, पाटोळे वस्ती ते भोंगाळे वस्ती२० लाख,येवती पापरी रस्ता ते सचिन कवडे वस्ती रस्ता,२० लाख. असे एकूण 80लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याप्रसंगी शुभारंभ प्रसंगी येवती गावचे सरपंच बालाजी खुर्द, सर्जेराव दाजी चवरे ज्योतीराम गोडसे, पापरी गावचे सरपंच, सौदागर खडके, नेपतगाव सरपंच पांडुरंग फरकाळे, रामहिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, पाटकुल गावचे उपसरपंच गणेश नामदे, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी बंडलकर, धनंजय खरे किरण पाटोळे, योगेश भोंगळे, विजय खरे, मौला बागवान, शिवा पवार, तात्या खुर्द, विनोद खुर्द, शुभम शितोळे, संदेश रंदवे, समाधान यादव, संजय मस्के, समाधान बाबर, मधुकर शितोळे, कालिदा शितोळे, अविष्कार शिंदे, आप्पा शितोळे, आनंद राजगुरू, सुधाकर शितोळे, अण्णा गोडसे, अशोक पाटोळे, बाळासाहेब पाटोळे शामराव व्यवहारे, माजी सरपंच संतोष शितोळे, पोपट गोडसे, नवनाथ भंडलकर, सचिन शितोळे, राहुल नागटिळक, अंकुश खुर्द, चंद्रकांत खुर्द, मुकेश गोडसे, आनंद जाधव, संजय गोडसे, समाधान साठे, अनिल खुर्द, नाना नवगिरे,अरुंद गोडसे, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती