पुणे : पुणे शहरात (pune city) बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva rangmmandr) कलादालनात न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन (Nude photography exhibition) भरवण्यात आले आहे. यामुळे छायाचित्रकाराला धमकीचा फोन (threatening phone) आला आहे. हे असले प्रदर्शन दोन मिनिटात (2 minit) बंद करा अन्यथा आंदोलन (Movement) केले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, कोणाच्यातरी दबावाखाली येत नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास बंद (shut down) केल्याचा आरोप ( Allegations) छायाचित्रकार अक्षय माळी याने केला आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने छायाचित्रकाराला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर बालगंधर्व व्यवस्थापनानेही त्याचे प्रदर्शन तातडीने बंद केले आहे. कोणाच्यातरी दबावाखाली येत नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास बंद केल्याचा आरोप छायाचित्रकार (Photographer) अक्षय माळी (akshay mali) याने केला आहे.
छायाचित्रकार अक्षय माळी हा छायाचित्रकार आहे. त्यानं पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफीमधून आपले शिक्षण (education) घेतले आहे. न्यूड फोटोग्राफि बदलाचा दृष्टिकोन बदलावा या संकल्पनेतून त्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तीन दिवसाचे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
7 जानेवारीला प्रदर्शन सुरु झाले. मात्र पाहिल्याच दिवशी अज्ञात नंबरवरून छायाचित्रकाराला धमकीचा फोन आला. “हे असलं प्रदर्शन दोन मिनिटात बंद करा, अन्यथा आंदोलन केले जाईल” अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा दुसऱ्या दिवशी पासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही. अशी माहिती अक्षय यांनी दिली आहे.
फोटोग्राफीचे प्रदर्शन तीन दिवस ( three days) सुरु राहणार होते. पण पहिल्याच दिवशी धमकीचा फोन आल्याने बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा (Balgandharva management) दुसऱ्या दिवशीपासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही. प्रदर्शनात लावण्यात आलेली चित्रे उलटी करून ठेवण्यात आली आहेत. नागरिक प्रदर्शन पाहायला आले तर हास्यास्पद दिसत आहे. मी याबद्दल कुठेही तक्रार करणार नाही. आज शेवटचा दिवस थांबून सायंकाळी प्रदर्शन काढणार असल्याचे अक्षयने म्हटलं आहे.
“न्यूड फोटोग्राफीबद्दल माझ्या मनात ज्या नवे विचार, कल्पना येतात. त्या मी फोटोग्राफीसारख्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी कितीही टीका केली अथवा धमकी दिली तरी माझी कला बंद करणार नाही. आणि धमक्यांना उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाही”
– अक्षय माळी, छायाचित्रकार