बार्शी ( सचिन आपसिंगकर) : गेल्या पाच दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी विशाल अंबादास फटे याच्यावर गुन्हा (crime news) दाखल झालाय. या विशालने जगातील सर्वात श्रीमंत माफिया ‘डॉन पाब्लो एस्कोबारला आदर्श मानलय. जिंदगी असावी तर पाब्लोसारखी असे तो नेहमी म्हणायचा. Don Pablo Escobar
विसाव्या शतकातील जगातील सर्वात श्रीमंत आणि विलासी माफिया डॉन पाब्लो एस्कोबार हा बिगबुल (bigbull) विशाल फटेचा आदर्श होता. तो नेहमी पाब्लोचे व्हिडीओ पहायचा आणि जिंदगी असावी तर पाब्लो सारखी, असे म्हणायचा. पाब्लोनेही त्याच्या आयुष्यात पैसे कमविताना कशाचाही विधिनिषेध बाळगला नाही. फक्त पैसे कमविणे हेच त्याचे ध्येय होते. त्याने अवैध व्यवसायातून आयुष्यभर इतके पैसे कमविले की 1989 मध्ये त्याला जगातील सातव्या क्रमाकांची श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते.
त्याला आलिशान बंगले, गाड्या आणि उंची राहणीमानाचा शौक (Hobby of luxurious bungalows, cars and high living) होता. पाब्लोच्या ऐषोआरामाचे अनेक किस्से प्रचलीत आहेत. एकदा प्रवासात असताना थंडीत उब मिळविण्यासाठी त्याने 2 मिलियन डॉलरची (Million dollars) म्हणजेच भारतीय चलनात 15 कोटी रुपयांच्या नोटांची शेकोटी पेटवली होती. हाच पाब्लो विशालच्या डोक्यात सदैव थैमान घालत होता. हातात पैसा खेळू लागल्यानंतर त्याच्याही राहणीमानात बदल झाला होता. त्याच्या वागण्या बोलण्यातून नवश्रीमंती डोकावू लागली होती.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विलासी जीवनाचा तो भोक्ता झाला होता. पाब्लो होण्याच्या त्याच्या या राक्षसी महत्वांकाक्षेला बार्शीतील काही लोभींनी खतपाणी घातले आणि अवघ्या काही महिन्यात शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांची टोपी घालून विशाल गायब झाला.
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया (Columbia in South America) राज्यात पाब्लोचा जन्म अत्यंत गरिबीत झाला होता. लहानपणी बूट नसल्यामुळे त्याला शाळेतून घरी पाठविण्यात आले होते. फी न भरु शकल्यामुळे त्याला शिक्षण (education) करावे लागले. त्यामुळे शाळकरी वयात पैशासाठी त्याने दफनभूमीतील दगडे चोरुन विकण्यास सुरुवात केली. पैसे कमविण्यासाठी जे-जे काही करता येईल ते तो करत गेला. वयाच्या 20 व्या वर्षी तो अट्टल चोर बनला.
अपहरण, दरोडा, तस्करी यातून तो 22 व्या वर्षी करोडपती झाला. पुढे तो ड्रग्ज तस्करीमध्ये घुसला आणि त्याने इतका काळा पैसा (money) कमविला की त्याला नोटा ठेवायला जागा अपुरी पडू लागली. दरवर्षी त्याच्याकडे असलेल्या नोटांचा दहावा भाग उंदराने कुरतडल्यामुळे रद्दीत जात होता. याच पाब्लोचा विशाल फ्यान होता. पाब्लो सारखे त्यांचे बालपण कष्टात गेले नसले तरी त्याच्यासारखंच त्यालाही काहीही करून झटपट श्रीमंत व्हावंसं वाटत होतं. आपल्या मित्रांनाही तो पाब्लोचे व्हिडीओ ( Pablo’s video) दाखवायचा आणि पैसा कमवावा तर पाब्लोसारखा असं सतत म्हणायचा.