सोलापूर : सोलापूर येथून जर्मनी आणि मलेशियाला गायीच्या शेणाच्या एक लाख गोव-या पाठविण्यात येत आहे. जय संतोषी माँ गोशाळेच्या वतीने या तयार करण्यात येत आहेत. ज्या गोष्टींना आपण फेकून देतो, ज्या गोष्टी आपल्याला टाकाऊ वाटतात त्यांनाही विकून पैसे कमावले जाऊ शकतात, हे यावरून दिसून येत आहे. Jai Santoshi Maa Gajul exports govara from Goshala in Solapur
शिवपुरीच्या आध्यात्मिक अग्निहोत्र केंद्राकडून जगातील अनेक देशांत अग्निहोत्र परंपरा चालवली जाते. त्यासाठी गायीच्या शेणाच्या गोव-या आवश्यक असतात. त्यासाठी जय संतोषी माँ गोशाळेला एक लाख गोवऱ्या पाठविण्याची ऑर्डर मिळाली आहे.
गोवऱ्या तयार केल्यानंतर त्या पूर्णपणे वाळवल्या जात असल्याने त्या अनेक महिने टिकून राहतात. गोवऱ्या वाळल्यानंतर त्याचे पॅकिंग दहाच्या बंडलमध्ये करण्यात येते. त्यानंतर पॉलिथिन पॅकिंग करून कार्टन पॅक करण्यात येतात. कंटेनरने हा माल शिपिंगने जर्मनी व मलेशियात पाठवला जात आहे.
स्थानिक बाजारात गोव-या चाळीस रुपयाला २५ नग याप्रमाणे विक्री केल्या जातात, तर विदेशात दहा रुपयाला एक याप्रमाणे त्याची किंमत मिळत असल्याची माहिती गोशाळेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गाजूल यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555632576114476/
गोशाळेतील बहुतांश गायी या भाकड असल्याने त्यांच्यापासून दूध उत्पादन पुरेसे होत नाही. पण, गोव-याच्या माध्यमातून गोशाळेचा अर्धा खर्च निघतो. उर्वरित खर्च उत्पादन विक्री व लोकांच्या मदतीने केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवपुरीच्या अध्यात्मिक अग्निहोत्र केंद्रांकडून जगभरात अग्निहोत्र परंपरा चालवली जाते. भारतासह जगभरातल्या विविध देशांमध्ये शिवपुरीच्या या केंद्रकडून अग्निहोत्र परंपरा चालवली जातेय. याच अग्निहोत्रासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांची आवशकता असते. जगभरात चालणाऱ्या या परंपरेसाठी सोलपुरातून गोवऱ्या निर्यात होणार आहे.
जय संतोषी माँ गोशाळा ही मागच्या अनेक वर्षांपासून गोवऱ्या निर्मितीचं काम करतेय. या गोशाळेत गोवऱ्या निर्मिती करत असताना त्यांच्या विशेष पॅकिंगकडे लक्ष दिले जाते. एक्स्पोर्ट होणाऱ्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने पॅक केल्या जातात. गोवऱ्या तयार केल्यानंतर या गोवऱ्या पूर्णपणे वाळवल्या जातात. त्यामध्ये थोडीही ओल ठेवली जात नाही. त्यामुळे या गोवऱ्या वर्षभरातसुद्धा खराब होत नाहीत.
या शिवाय ही गोशाळा गोफीनाईल, गोमुत्र अर्क, जीवामृत, दंत मंजन, पेन किलर बाम यासारखी अनेक उत्पादने तयार करते, मात्र गोवऱ्यांच्या निर्मिती व निर्यातीमुळे या गोशाळेचे नाव होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555616462782754/