सोलापूर – मंगळवेढ्याजवळ मारुती ओमिनीला पाठीमागून वाहन धडकल्याने ओमिनी उलटून १० प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता. 4) रात्रीच्या सुमारास घडला. सर्व प्रवासी तासगाव (जि.सांगली) येथील असून ते सर्वजण अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. 10 passengers of Sangli injured in Solapur accident
विनोद पवार (वय ३५), गिरीजा पवार (वय ३२), सुनिता साळुंखे (वय ३०), निशा साळुंखे (वय २३), दीक्षा पवार (वय १४), गणेश पवार (वय २१), अक्षय पवार (वय २६), पूर्वा साळुंखे (वय २१), अनिता पवार (वय२०) आणि वैदही साळुंखे (वय ५ वर्षे सर्व रा. तासगाव जि.सांगली) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्वजण तासगाव ते अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते.
रात्री १२:३० वाजेच्या सुमारास मंगळवेढा पासून दहा किलोमीटर अंतरावर पाठीमागून दुसरे वाहन धडकल्याने मोटार उलटून सर्व जण जखमी झाले. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ अर्जुनसोंड येथे मारहाण; पती पत्नी जखमी
अर्जुनसोंड (ता.मोहोळ) येथे भावकीतील शेतीच्या वादातून काठीने केलेल्या मारहाणीत योगेश नागनाथ हावळे (वय ३०) आणि त्यांची पत्नी सारिका हावळे (वय २८) हे दोघे जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगेशचा भाऊ सोमनाथ हावळे याने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555616462782754/
□ नशेत गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
पंढरपूर येथील संतपेठेत राहणाऱ्या जीवराज पांडुरंग गायकवाड (वय ५०) याने दारुच्या नशेत गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. 4) दुपारच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून (मुलगा) रोहित याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
□ शेळगी येथे लोखंडी गजाने मारहाण करून जखमी
शेळगी परिसरातील सुपर हॉल येथे लग्नात झालेल्या किरकोळ भांडणावरून लोखंडी गज आणि हाताने केलेल्या मारहाणीत मुबारक बाशु कुचनाळ (वय ३० रा.भवानी पेठ) हा जखमी झाला.
ही घटना रविवारी (ता.5) दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शफिक कान्याल आणि अन्य सहा जणांनी मारहाण केली. अशी नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555600299451037/