सोलापूर : शहरातील सिद्धेश्वर नगर भाग ४ मध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील चाळीस गॅस टाकी जप्त केल्या आहेत. या गॅस टाक्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांच्या प्रेषक इंडेन गॅस एजन्सीच्या असल्याने गुन्ह्यात लोलगे यांचेही नाव घेण्यात आले आहे. NCP’s Vice President Vidya Lolge’s name in the black gas market
घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरमधील गॅस धोकादायक आणि असुरक्षितपणे इतरांच्या जीवितास धोका होईल असे ठेवण्यात आले होते.व्यावसायिक सिलिंडरमध्ये इलेक्ट्रिक मोटारच्या सहायाने स्वयंपाकाचा गॅस भरताना आढळून आले. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इण्डेन कंपनीच्या ७९ टाक्या जप्त केल्या आहेत. सोबत नोझल स्वीच, इलेक्ट्रिक बोर्ड,काळ्या रंगाची २० फूट वायर,आयकॉन कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा,रिक्षाचे जुने टायर असा एकूण एक लाख ३८ हजार २७२ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जकीर अब्दुल सत्तार (वय ४२ रा,सिद्धेश्वर नगर भाग ४ ,सोलापूर) असे पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यात प्रेषक गॅस एजन्सीच्या मालकीण विद्या लोलगे यांचे ही नाव आहे.
गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, एपीआय नंदकिशोर सोळुंके व एपीआय दादासो मोरे यांनी पथकासह छापा टाकुन कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई मध्ये इंण्डेन कंपनीचे व्यवसायीक ११ गॅस टाक्या व रिकाम्या १४ टाक्या, घरगुती वापरातील २९ गॅस टाक्या व रिकाम्या २४ व एक व्यवसायीक वापराची एक लहान गॅस टाकी अशा एकुन ७९ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. तसेच इलेक्ट्रीक मोटार इलेक्ट्रीक बोर्ड, वायर, स्वीच व आयकॉन कंपनीचा वजन काटा असा एकूण १ लाख ३८ हजार २७२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ सह भादंवि २८६, ३३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, सहा. पोलीस निरीक्षक दादासो मोरे, पोलीस अंमलदार संतोष मोरे, भारत पाटील, अजिंक्य माने, इम्रान जमादार, विनोद रजपुत, राजकुमार पवार, निलेश शिरुर, विजय वाळके, संदिप जावळे, चालक सतीश काटे, नेताजी गुंड यांनी केली आहे.
□ विद्या लोलगे यांची प्रतिक्रिया
या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विद्या लोलगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी अटकेतला इसम आमचा डिलिव्हरी बॉय नाही, तो नई जिंदगी भागात सामाजिक कार्यकर्ता आहे. अनेक महिलांना त्याने रेशन कार्ड करून दिले आहे. तसेच अनेकांना उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळवून दिले आहे.
सोलापुरात इंडियन ऑइलच्या तीन गॅस एजन्सी आहेत. आमच्या गॅस एजन्सी कडून संबंधित कुटुंबाला गॅस टाकी दिली जाते पुढे त्याचे काय होते आम्हाला काय माहीत नाही. यामध्ये माझे नाव कसे आले याबाबत माहिती घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे म्हटलंय.