मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण कोराना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. आज मंगळवारी स्वत: राम चरणने सोशल मीडियावर ही माहिती दिली. रामचरण हा साऊथ मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिलेत.

‘मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. पॉझिटीव्ह आढळल्यानंतर मी स्वत:ला घरात क्वारंटाइन केले आहे. मी लवकर बरा होईल, अशी आशा करतो,’ असे ट्विट त्याने केले. गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्याने केले. या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरू केल्यात.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या ‘आरआरआर’ या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. यात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर लीड भूमिकेत आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, एसएस राजमौली. यामुळे ‘आरआरआर’ बद्दल प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबरला रामचरण एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाचे शूटिंग करत होता. याच दिवशी त्याने सुश्मिता कोनिडेलाच्या एका वेबसीरिजसाठी प्रमोशन देखील केले. 25 डिसेंबर म्हणजे, ख्रिसमसला त्याने एक छोटीशी पार्टीही अटेंड केली. या ख्रिसमस पार्टीत त्याचे काही मित्रमंडळी सहभागी झाले होते. राम चरणने या ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात तो मित्रांसोबत त्याच्याबरोबर ख्रिसमस एन्जॉय करताना दिसत आहे.

यावर्षी मार्च महिन्यांत रामचरणने ट्विटर ज्वॉईन केले होते. ट्विटर ज्वॉईन केल्याच्या केवळ 233 दिवसांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. केवळ 233 दिवसांत 10 कोटी ट्विटर फॉलोअर्स मिळवणारा रामचरण साऊथचा पहिला अभिनेता ठरला आहे.
