सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर मार्गावरील भोसे गावानजीक या चारशे वर्षापूर्वीच्या वटवृक्षासाठी ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन उभे केले आहे. सांगली जिल्ह्यातील भोसे येथील चारशे वर्षांच्या वृक्षाला वाचविण्यासाठी सांगलीत आंदोलन उभे राहात आहे.सांगली जिल्ह्यातील भोसे येथील या वटवृक्षाच्या साठी चळवळ सुरू झालेली आहे. यात ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी ही सहभागी झाले आहेत.
या वटवृक्षाचे अस्तित्व रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे धोक्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यायी मार्गाने रस्ता करून हा वटवृक्ष वाचवावा, अशी मागणी होत आहे.
या संदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लक्ष घातले आहे. त्यांनी केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांना याबाबत पञ पाठविले आहे.
मात्र कोणत्याही परिस्थितीत झाड तोडू देणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा वृक्षप्रेमी यांनी दिला आहे. हे झाड वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री परिवार सदस्य, वृक्षप्रेमी व पर्यावरण प्रेमींनी आंदोलन पुकारलेले आहे.