मुंबई : आपल्या बहिणीच्या कोरोनामुक्तीनंतर ती घरी आल्यानंतर गाणे लावून तुफान नाचून तिचे स्वागत करणा-या सलोनीचा व्हिडिओ सर्वञ व्हायरल होत आहे. तिच्या या खिलाडूवृत्तीचे ‘मन जिंकलंस लेकी’ म्हणून महिला बाल विकास मंञी यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरही टाकले आहे. तर सलोनीने असं तुफान नाचून स्वागत करण्यामागचं हे एक ‘कारण’ समोर येत आहे. यातून या कोरोनाच्या वातावरणात समाज कसा बदलत आहे, हे दिसून आले.
हा व्हिडीओ पुण्यातील आंबेगाव पठार येथील मोहन नगर भागात शूट झालेला आहे. आणि या व्हिडीओ मध्ये दिसणारी मुलगी सलोनी सातपुते आहे. व्हिडीओमध्ये दुसरी दिसणारी मुलगी हि तिची बहिण आहे, ती कोरोनावर मात करून आल्यावर तिने आनंदात तिचे तुफान नाचून स्वागत केले आहे. सलोनी हि इंजिनियरिंगची विद्यार्थी आहे आणि ती प्रोफेशनल डान्सरदेखील आहे.
परंतु या सर्व गोष्टी मागची कहाणी वेगळी आहे. तर झाले असे कि सलोनीचे वडील कापड दुकानात काम करतात, सर्व प्रथम त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे दिसली आणि ४ जुलै ला त्यांना पुणे मधील भारती हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर तिचे आजी आजोबा, आई आणि बहिण देखील कोरोनाचे लक्षणे आढळले. घरात ती फक्त एकटी निगेटिव्ह आली. परंतु त्यानंतर तिच्या सोबत शेजारी पाजारी वेगळ्या पद्धतीने वागू लागले.
घरात ती एकटी राहली होती आणि तिला कोणी आधार द्यायला नव्हते. परंतु एक एक करत सगळे बरे झाले मागील शुक्रवारी तिची बहिण स्नेहल हिला सुट्टी मिळाली, त्यानंतर तिने तिचे स्वागत करण्याचे ठरविले आणि स्पिकर लावून तिचे तुफान स्वागत केले आहे. सलोनीला नाचताना पाहून तिची कोरोनातून बरी झालेली बहिणसुद्धा तिच्या आनंदाच सामिल झाली अन् नाचायला लागली.
या गोष्टीवरून एक नक्की लक्षात येते कि कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना मानसिक आधाराची गरज असताना समाज त्यांच्या बरोबर जी वागणूक देतो ती योग्य नाही आहे. या सर्व टेन्शनमध्ये तिला तिच्या काही जवळच्या मित्र मैत्रिणीनी साथ दिली. त्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ चांगले राहिले, असे ती सांगते.
आयुष्य हे एक महोत्सव आहे आणि ते साजरे केले पाहिजे. कोरोनासारखा रोग ज्यावर अजून लस सापडली नाही आहे. म्हणून घाबरून जाणारे गलितगात्र होणारे अनेक जण आहेत. या सर्वांनाच सलोनीने दाखवून दिलं आहे. कितीही संकटे आली तरी खचू नका give up करू नका we will win…असं सलोनीची बहिण स्नेहल सातपुते हिनं सांगितलं आहे.