कर्नाटक : महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं विधान मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केलं आहे. इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकालाही करोना विषाणूचा विळखा बसला आहे. देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. सुरवातीला कमी बाधित असलेलं राज्य म्हणून कर्नाटक चर्चेत होत, मात्र आता कर्नाटकात सुद्धा कोरोना फोफावत आहे.
कर्नाटकात सोमवारी ३ हजार ६४८ नवीन रुग्ण सापडले असून आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरुप्पा यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे म्हटले आहे. येडीयुरुप्पा यांनी आज मंगळवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल जनतेला संबोधित केले.
येडीयुरुप्पा म्हणाले, राज्यात पाच टप्प्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत असून तज्ज्ञ मंडळींनी सुचवलेल्या 5T स्ट्रॅटजी वापरण्यात येत आहे. यामध्ये ट्रान्स, ट्रॅक, टेस्ट, ट्रेट अँड टेक्नोलॉजी, अशे पाच टप्पे आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल राज्यातील जनतेला संबोधित करत असताना येडियुरप्पा यांनी हे विधान केलं आहे. येडीयुरुप्पांनी राज्यातील हॉटस्पॉट वगळता इतर भागात लॉकडाउन नसेल, असे स्पष्ट केले.. सुरुवातीला कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात होती. पण त्यानंतर महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे राज्यातील रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं येडियुरप्पा म्हणाले.
राज्यातील हॉटस्पॉट वगळता इतर भागात लॉकडाउन नसेल ही घोषणाही यावेळी येडियुरप्पांनी केली. यावेळी बोलत असताना येडियुरप्पांनी राज्यातील जनतेला सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं. बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, स्वच्छता यासारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सध्याच्या घडीला करोनाचा सामना करण्यासाठी हाच उपाय असल्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहनही येडियुरप्पांनी केलं.