सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने निराळे वस्तीत रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन केले होते. निराळे वस्ती येथील विठ्ठल मंदिर येथे १०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात देगाव यु.पी एच.सी सेंटरच्या डॉ.सायली शेंडगे व त्यांच्या टीमने नागरिकांची तपासणी केली. या प्रसंगी नगरसेवक देवेंद्र कोठे, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के यांची उपस्थिती होती.
शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर शिंदे, योगेश पवार, शैलेश मोरे, मनोज मस्के, अजय मस्के ,शंकर सरवदे, सिद्धू ढोबळे, विलास घाडगे, संतोष सुरवसे, लखन पवार, किरण पवार, बाबा शेख , राहुल गोयल , अक्षय आयवळे यांनी परिश्रम घेतले. धरमशी लाईन येथे 61 जुनी पोलीस लाईन 42 जणाची तपासणी करण्यात आली.