नवी दिल्ली : भारताची सुवर्णकन्या हिमा दासने कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने २०१८ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. हे पदक आता कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करण्याचा कौतुकास्पद निर्णय तिने घेतला आहे.
‘देशातील पोलीस, डॉक्टर्स, नर्स सफाई कर्मचारी आदी आदी कोरोना वॉरियर्स आपले रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.भारताची सुवर्ण कन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे.
तुमचं हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
२०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते, परंतु त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले.
कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रीडापटूंसाठी ही खूप मोठी आनंदाची वार्ता ठरली. हिमानं हे सुवर्णपदक कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित केलं आहे.