नवी दिल्ली : देशभरात १ ऑगस्टपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू करताना काही अटींवर चित्रपटगृहे, जिम सुरू करण्यास परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, मेट्रो रेल्वेसेवा बंदच राहणार असल्याचे वृत्त आहे.
अनलॉकच्या तिस-या टप्प्यात जिम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता असून त्यामुळे व्यायामप्रेमींना व आरोग्य तंदुरुस्त ठेवू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)
लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंंद्र सरकारने काही निर्णय जाहीर करणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृह खात्यानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र विविध राज्य सरकारांनीच त्यांच्याकडील कोरोनाविषयक स्थिती पाहूनच केंद्राच्या निर्णयांची कितपत अंमलबजावणी करायची हे ठरवले जाणार आहे.
* शाळा सुरु कराव्यात का ?
शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी का, याविषयी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने विविध राज्यांशी याआधीच चर्चा सुरू केली होती. केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिता कारवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही पार पडली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल यांनी याआधी सांगितले होते की, शाळा पुन्हा सुरू कराव्यात का याविषयी केंद्र सरकार पालकांची मतेही विचारात घेणार आहे. त्यानुसार चाचपणी केली असता पालकही शाळा सध्या सुरू करू नका, याच मताचे आहेत, अशी
माहिती मिळते.
* चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स चालू होण्याची शक्यता
देशभरातील चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने अनुकूल अभिप्राय दिला आहे. मात्र त्यासाठी चित्रपटगृह, मल्टिप्लेक्सच्या मालकांशी सरकार चर्चा करत आहे. चित्रपटगृहाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या प्रेक्षकांनाच चित्रपट खेळासाठी प्रवेश देण्यास मालकमंडळी राजी आहेत. कमी प्रेक्षकसंख्येमुळे फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जाईल, असे त्यांचे मत आहे. परंतु चित्रपटगृह, मल्टिप्लेक्समध्ये फक्त २५ टक्केट प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मत आहे.