सोलापूर : अमोल जगताप आत्महत्या प्रकरणात पोलिसांना तपासात आणखी 12 लोकांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील 5 जणांना आज मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सावकाराच्या कर्जाला कंटाळून हांडे प्लॉट येथे राहणार्या अमोल जगताप याने आपल्या पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली होती.
श्रीनिवास महांकाळी येलदी (वय 52, रा. शास्त्री नगर), कासिम नालबंद ( वय 36, शनिवार पेठ), दिलीप अजमेर गायकवाड (वय 38, रा. सेटलमेंट), किरण माणिक जाधव (वय 33 , रा. लिमयेवाडी), राहूल मारूती सर्वगोड (वय 42, रा. मोदी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संतोष नरसिंग श्रीराम (रा. उमा नगरी, मुरारजी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल जगताप आणि संतोष श्रीराम यांच्यासह चौघे मिळून हॉटेल गॅलेक्सी चालवत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संतोष श्रीराम यांच्या फिर्यादीनुसार येलदी याने त्याला व अमोलला 7 लाख 50 हजार रूपये 6 टक्के व्याजाने, कासिम नालबंद याने 3 लाख 50 हजार 10 टक्के व्याजाने, दिलीप गायकवाडने 1 लाख 10 टक्के व्याजाने, किरण जाधव याने 3 लाख 10 टक्के व्याजाने तर दिलीप सर्वगोड याने 5 लाख 15 टक्के व्याजाने दिले होते. या सर्वांना संतोष आणि अमोल दरमहा व्याज देत होता. काही रक्कम त्यांनी दिलीही होती.
मात्र उर्वरित 99 लाख 98 हजारांच्या वसुलीसाठी हे सर्वजण दोघांना फोनवरून धमकी देत होते. अनेकदा श्रीराम यांना पत्नीसमोर ठार मारण्याची धमकीही दिली होती. हे सावकार आपल्या कुटुंबाला धोका पोहचवतील म्हणून श्रीराम 11 डिसेंबर 2019 रोजी घरातून निघून गेला होता. तर त्याचा भागिदार अमोल जगताप याने आपल्या पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली.
त्यानंतर श्रीराम सोलापुरात आल्यावरही राहुल सर्वगोड याने श्रीरामच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. श्रीराम यांच्या फिर्यादीनुसार या पाच सावकारांना स. पो.नि. पवळ यांनी मंगळवारी अटक केली. अमोल भोसले, सिध्दाराम बिराजदार, बंडू बिराजदार, दशरथ जाधव, अमोल गायकवाड, दशरथ कसबे, गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तापडिया यांनी 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपी दिलीप गायकवाड, राहुल सर्वगोड यांच्यातर्फे ऍड. रझाक शेख व ऍड. इस्माईल शेख यांनी तर सरकारतर्फे ऍड.संजय देवमाने यांनी काम पाहिले.