सोलापूर : सोलापूर शहरात आज बुधवारी आलेल्या कोरोना आहवालात कोरोनाचे 38 रुग्ण आढळून आले आहेत. ऍटेजन टेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तपासणी होत असल्याने निगेटिव्ह रूग्णांची संख्या मध्ये वाढ होत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालाता 435 अहवाल निगेटिव्ह तर 38 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 20 पुरुष तर 18 महिला रुग्णांचा समावेश आहे. आज 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 823 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 840 तर महिला 1 हजार 983 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 356 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 234 तर महिला 122 रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 473 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 435 अहवाल निगेटिव्ह तर 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 32 हजार 108 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 27 हजार 063 आहे. तर 4 हजार 823 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 516 असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 951आहे.
आज बुधवारच्या अहवालातील चार मृत व्यक्ती अक्कलकोट रोड परिसरातील 70 वर्षाचे पुरुष, मजरेवाडी हत्तुरे वस्ती परिसरातील 68 वर्षाचे पुरुष काडादी चाळ परिसरातील 71 वर्षांचे पुरुष आणि जुना विडी घरकुल परिसरातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.