मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला आहे.
बारावीच्या निकालांप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा दहावीचा निकाल 96.91 टक्के लागला. तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून त्यांचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.77 टक्के लागला. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के लागला.
गेले काही दिवस बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरले. CBSE आणि HSC बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झालीय.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SSC बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून खबरदारी म्हणून दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्यात आला होता. तेव्हा याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
याबाबतची अधिकृत माहिती तुम्हाला mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in या वेबसाईट्सवर उपलब्ध होऊ शकेल.
* विभागनिहाय टक्केवारी :-
कोकण – ९८.७७ टक्के
पुणे- ९७.३४ टक्के
कोल्हापूर -९७.६४ टक्के
अमरावती – ९५.१४ टक्के
नागपूर – ९३.८४ टक्के
मुंबई- ९६.७२ टक्के
लातूर – ९३.०७टक्के
नाशिक – ९३.७३ टक्के
औरंगाबाद – ९२ टक्के
निकालाची वैशिष्ट्ये :-
– कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के
– औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के
– गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ
– राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण