सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 194 नव्या रूग्णांची भर पडली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 3 हजार 312 झाली आहे तर मृतांची संख्या 96 झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी वाढलेल्या 192 रूग्णांमध्ये सर्वाधिक 70 रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले आहेत. पंढरपुरात एकूण रूग्ण 491 झाले आहेत. तर पंढरपुरातील सरकोली गावातील आणि कदबे गल्लीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अक्कलकोट शहरातील दोन तर अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच माढा तालुक्यातील उपळाई आणि उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी ग्रामीण मधील 74 लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
* तालुकानिहाय रूग्ण संख्या
अक्कलकोट 446, बार्शी 739, करमाळा 88, माढा 167 माळशिरस 168, मंगळवेढा 98, मोहोळ 226, उत्तर सोलापूर 258, पंढरपूर 491, सांगोला 81, दक्षिण सोलापूर 540.