मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने खळबळजनक खुलासा केला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: तिला सांगितलं, असं अंकिताने बिहार पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चर्कवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवण्यासाठी आज बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचले. गोरेगाव येथील अंकिताच्या राहत्या घरी बिहार पोलिसांनी भेट देत तिचा जबाब नोंदवला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रिया बद्दल बोलत होता, असं अंकिताने सांगितलं आहे.
रिया मला खूप त्रास देते. तिच्या सोबतच्या रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्या पासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली आहे.
* अभिनेञी रियाचे पलायन
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या बिहार पोलिसांना हात हलवत परतावे लागले. रिया घरी नसल्याने पोलीस तिची चौकशी करू लागले आहेत. दरम्यान रियावर गंभीर आरोप झाल्यानंतर पोलीस चौकशीपासून वाचण्यासाठी रिया ही फरार झाली असल्याची चर्चा आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे.