मुंबई : राम मंदिराचं भूमीपूजन होतंय त्याचा अभिमान आहे, पण कोरोना काळात भूमीपूजन व्हायला पाहिजे का? तर लोक सध्या वेगळ्या मानसिकतेत आहे, आणखी २ महिने भूमीपूजन पुढे गेले असते तर बरं झालं असतं, कारण मोठ्या उत्साहात लोकांना हे साजरा करता आलं असतं, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धूमधडाक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको, त्याचं जल्लोषात भूमीपूजन हवं असं, प्रतिसवाल करीत मुख्यमंञी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला नापसंती दर्शवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत राज ठाकरे यांनी सांगितले की, अयोध्येत राम मंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य कार सेवकांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. भूमीपूजन होतंय त्याचा आनंद मात्र त्याहून मंदिर निर्माण झालं तर जास्तच आनंद होईल. राम मंदिराचं भूमीपूजन धुमधडाक्यात व्हायलाच पाहिजे, ई-भूमीपूजन कशाला हवं? अशी परखड भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली आहे.
* लॉकडाऊन हटवण्याची मागणी
कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली