सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 254 नवीन रुग्ण, शहरी भागात 20 रुग्ण, ग्रामीण भागात 65 असे एकूण तब्बल 339 रुग्ण आढळून आले आहेत. आज 339 ची भर पडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या अडीच हजार पार होऊन 2 हजार 643 वर पोहोचली आहे.
आज 95 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तीची रुग्ण संख्याही 1 हजार 128 वर गेलीआहे. उपचाराखाली 1 हजार 437 रुग्ण आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 92 रुग्ण चिंताजनक आहेत. तसेच 95 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 981,शहरी भागातील 196, मनपा क्षेत्रातील 1466 अशी आहे. मनपा क्षेत्राने 1466 चा आकडा ओलांडला आहे.
आजचे नवीन पॉझिटिव्ह आटपाडी तालुका 6, जत तालुका 10, कडेगाव तालुका 2, कवठेमहांकाळ तालुका 15, खानापूर तालुका 3, मिरज तालुका 23, पलुस तालुका 18, शिराळा तालुका 5, वाळवा तालुका 2,सांगली 173, मिरज 81 असे आहेत.
आजच्या सहा मृतांमध्ये वासुंबे तालुका तासगाव येथील 62 वर्षांचा पुरुष. कर्नाळ येथील 62 वर्षांचा पुरुष. मिरज येथील 80, वर्षांचा पुरुष भोसे येथील 75 वर्षांची महिला, खटाव येथील 60 वर्षांची महिला, सांगली येथील 70 वर्षांची महिला, असे सहाजणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 92 झाली आहे.
* तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण.
आटपाडी 135,जत 152, कडेगाव 62, कवठेमहांकाळ 77, खानापूर 56, मिरज 186,पलूस 120, शिराळा 189, तासगाव 70, वाळवा 120, मनपा 1466 अशी आहे.