सोलापूर : सोलापूर शहरात आज शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे नवे 56 रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र 920 अहवाल निगेटिव्ह तर 56 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 29 पुरुष तर 27 महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शहरातील कोरोना रुग्णसंख्या पाच हजाराच्या टप्प्यावर आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 985 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 922 तर महिला 2 हजार 063 रुग्णांचा समावेश आहे. आज तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 236 तर महिला 123 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 976 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 920 अहवाल निगेटिव्ह तर 56 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 34 हजार 065 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 28 हजार 783 आहे तर 4 हजार 985 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 590 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 36 आहे.
आज मयत झालेल्या तीन व्यक्ती कोंडानगर अक्कलकोट रोड परिसरातील 69 वर्षाची महिला. नेहरू नगर विजापुर रोड परिसरातील 49 वर्षाचे पुरूष , राजेश कोठे नगरातील 70 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे.