मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, शिवसेनेने पाठोपाठ मनसेने कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे. मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणावतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे.
“मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा”, अशा शब्दात असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. “कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?” असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.
दरम्यान, “मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणावतवर हल्लाबोल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”
कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला. ‘बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा’ असा एल्गार कंगनाने केला. कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला.