बार्शी : लग्नानंतर अवघ्या 7 दिवसांमध्ये तोंडी तलाक दिल्याबद्दल 9 जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लॉकडाऊन काळात लग्न झाल्याने वाचलेल्या खर्चाचे पैसे वडिलांकडून आणून दे, यासाठी लग्नाच्या दुसर्या दिवसापासूनच फिर्यादीचा छळ सुरु झाला.
पैशाची मागणी पूर्ण न केल्याने 7 दिवसांतच तिला माहेरी परतावे लागले. यावरुन पती वसीम मजीद पटेल, सासु सालेहा मजीद पटेल, सासरे मजीद हमीद पटेल, नणंद मजिना मजीद पटेल (सर्व रा. पटेल कॉम्प्लेक्स, बार्शी रोड, परांडा जि.उस्मानाबाद), चुलत सासरे दादामिया हमीद पटेल , चुलत सासु तस्लिम दादामिया पटेल (दोघे रा. नागणे प्लॉट, बार्शी ), जफर काझी (मौलाणा) , मुनेरा जफर काझी , अक्सा जफर काझी (सर्व रा. पल्ला मजीद जवळ, मंगळवार पेठ, परंडा जि.उस्मानाबाद) अशी या प्रकरणातील अरोपींची नावे असून नमीरा वसीम पटेल या विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचे लग्न गेल्यावर्षी जमले होते. त्यावेळी 31 मे लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे लग्न मंगल कार्यालयात करता न आल्यामुळे घरीच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. लग्नामध्ये सासरकडील मागणीनुसार वरदक्षिणा म्हणून 5 पाच लाख रोख, 11 तोळे सोने व दिवाण, कपाटासाठी 51 हजार रोख देण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लग्नाच्या दुस-या दिवशी अरोपींनी लॉकडाउनमुळे तुझे लग्न तुझ्या वडिलांनी साधेपणाने केले. ठरल्याप्रमाणे केले असते तर तुझे वडिलांचे दहा लाख रूपये खर्च झाले असते, तुझे वडीलांचे दहा लाख रू. वाचले आहेत, तुझ्या नव-याच्या व्यवसायासाठी दहा लाख रूपये देण्यासाठी तुझे वडिलांना सांग, असे म्हणून सारखा त्रास देण्यास सुरूवात केली.
त्यानंतर दोन दिवसांनी वलीमा कार्यक्रमासाठी आलेल्या फिर्यादीच्या आई-वडिलांनाही त्यांनी मागणी केली. त्यानंतर जुमागी दिवशी फिर्यादी पतीसमवेत त्यांच्या मावशीच्या घरी गेली असता तिथे तिला पती आणि त्याच्या मावस बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचे कळाले. त्यावेळी पती वसीम याने माझे हिच्यावर प्रेम होते, तू जे पाहिले ते कोणास सांगू नको नाहीतर तुला तलाक देईन, अशी धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादीने घरी परतल्यानंतर सासु, सासरे, नणंद, चुलत सासरे, चुलत सासु, अक्साचे आई वडील यांना पती वसीम याचे अक्सा सोबत प्रेम होते तर माझे सोबत लग्न का केले असे विचारले असता ते सर्वजण तुला वेड लागले आहे, असे खोटे आरोप करू नको, तू वडिलाकडून दहा लाख रूपये पण आणत नाही व उलट खोटे आरोप करते आम्ही तुला नांदवणार नसल्याचे म्हणाले.
त्यावेळी सासु सालेहा, नणंद मिजना यांनी केस ओढुन त्यांच्या हाताने तोंडावर व पाठीवर तर मुनेरा व अक्सा काझी यांनी लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या आई-वडिलांना बोलावून घेवून सर्वा समक्ष पतीने मैने तुझे तलाक दिया असे म्हणून तिला बेकायदेशीर तलाक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.