मुंबई : कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कांदिवलीत शिवसेना शाखाप्रमुखासह सहाजणाना अटक केल्याचे वृत्त आहे.
निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
”एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला.
याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील काही वर्षे खर्ची घातली असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे. जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवतायत.”, असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. फिर्यादी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरुन आरोपी कमलेश कदम व त्याच्या 8 ते 10 साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन एफआयआरची कॉपी आणि मारहाणीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय.