सोलापूर : सोलापूर ही ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची नगरी, पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते. श्री सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत होऊन गेले, ज्यांनी 68 हजार वचने लिहिली व जिवंत समाधी घेतली, ज्यास शिवयोग समाधी असेही म्हणतात. त्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करावे, अशी मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी संसदीय अधिवेशनात केली.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत, साहित्यिक होते, ज्यांनी तब्बल 68 हजार वचने लिहिली. तसेच मराठा बांधवांना आरक्षण द्यावे व सोलापूर जिल्ह्यात सांस्कृतिक पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याबाबतची मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिद्धरामेश्वरांनी सामुदायिक विवाहाची सुरवात केली. सोलापूर पुण्यभूमीचा, येथील नागरिकांचा विचार करून 40 एकरात भव्य तलावाची निर्मिती केली. याच तलावाच्या मधोमध अमृतसर येथील सुवर्ण मंदिरासारखे भव्य सुंदर मंदिर सुशोभित आहे. गेल्या आठ शतकांपासून प्रतिवर्षी येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान भव्य यात्रा भरते. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून 10 लाखांहून अधिक भाविक सहभागी होतात.
याचा विचार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना विनंती करत सोलापूर रेल्वे स्थानकाचे नामांतरण करण्याची मागणी करण्याबाबत प्रश्न खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उपस्थित केला.