पुणे : सोलापूर येथील पोलिस निरीक्षकाने पुण्यात महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील भवानी पेठ पोलीस लाईनमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत माने हे सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे. हे माने पुण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांची व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर घर दाखविण्याच्या बहाण्याने चंद्रकांत यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलीस लाईनमध्ये नेले होते.
फ्लॅट दाखविण्यासाठी नेऊन कोल्डिंगमधून गुंगीचे औषध पाजून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत भगवानराव माने असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हा प्रकार सप्टेंबर २००९ पासून आतापर्यंत सुरु होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटनास्थळी त्या प्रकाराचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग केले. हा प्रकार समजल्यावर त्याने तिला हे फोटो व व्हिडिओ दाखवून ते नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिला लवकरच लग्न करु, असे आश्वासन देऊन तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिने अनेकदा लग्नाविषयी विचारल्यावर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली.
१७ फेबुवारी २०२० रोजी माने याने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉटस अपवर स्वत:चे अश्लिल फोटो पाठविले. त्यानंतर लॉकडाऊनमध्येही त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचे पुरावे पोलीस गोळा करीत असल्याचे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.