पंढरपूर / सोलापूर : केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. राज्यपालांकडून वेळ दिली नाही. मात्र आज शरद पवारांसमोर त्या शेतकऱ्याने गा-हाण मांडली.
राज्यपाल हे सिनेकलावंत, राजकीय नेत्यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांनी दखलही घेतली नाही. मात्र, माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या युवा शेतकऱ्यांना वेळ देत त्यांचे गाऱ्हाणे एकूण घेतले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुले असणारे बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर, पंकज चिवटे व निखिल सातपुते यांनी आज पंढरपूर येथे खासदार शरद पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या, यावेळी पवार यांनी सविस्तरपणे एकूण घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी, नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. साहेबांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले असल्याचं विरेश आंधळकर यांनी सांगितले.
* आमदार रोहित पवारांनीही केली होती विनंती
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शेतकरी पुत्रांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. रोहित यांनी ट्विटकरत ‘महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास असल्याचं म्हंटल होतं.