मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते.
स्वरा भास्कर हिने आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच तिला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर स्वराने संताप व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सवर्ण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. “या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? पायल पेक्षा या पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या मदतीची गरज अधिक होती.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायल घोषने केलं. यामुळेच आज रामदास आठवले यांच्यासह अभिनेत्री पायल घोष राज्यपालांच्या भेटीस गेले होते.