मंगळवेढा : तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी हे लक्ष्मी देवीचे तीर्थक्षेत्र म्हणून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाला सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. याच देवीच्या मंदिरातील लक्ष्मीदेवीच्या चांदीच्या सुमारे अर्धा किलोच्या पादुका शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लंपास केल्याने गावात एकच खळबळ उडाली.
लाॅकडाऊन मुळे लक्ष्मीदेवीचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. या संधीचा फायदा घेऊन शुक्रवारी मध्यरात्री लक्ष्मी देवीच्या अर्धा किलो चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लक्ष्मी देवीचे पुजारी लाला सोनवले हे नियमित सकाळी संध्याकाळी देवीची पुजा करत असतात नियमितपणे शनिवार सकाळी पूजेसाठी ते मंदिरात आले असताना दार उघडे दिसले, दरम्यान पुजारी यांनी गावचे पोलिस पाटील मधुकर पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी सदर माहिती मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना भ्रमणध्वनी माहिती दिली.
चोरीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक फिंगर प्रिंट फॉरेन्सिक पथक यांनाही पाचारण करण्यात आले होते. श्वान मंदिरातच घुटमळल्याने श्वान पथकाला काही हाती लागले नाही. लक्ष्मी देवीच्या मुख्य मंदिराचे ग्रील तोडून चोरट्यांनी देवीच्या अर्धा किलो चांदीच्या पादुका चोरीला गेल्यामुळे भावीक-भक्ताच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या चोरीचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.