लातूर : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज काँग्रेसवर चौफेर टीका केली. मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्या कारणानं राहुल गांधी हे धडपडून पडलेत, अशी खिल्ली उडवणारं विधान देखील रावसाहेब दानवे यांनी लातुरात केलं.
ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मागील सहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करून गोरं होतं का? हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, अशी खोचक टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते पडले. याबाबत त्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारे विधान केलं आहे. गर्दीत जाण्याची सवय नसल्याकारणाने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे खूप महत्वपूर्ण आहेत. मात्र, विरोधी पक्ष त्याला कायम विरोध करत आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत विधेयक पास केलं आहे. मात्र, राज्य सरकारने हे विधेयक आम्ही आमच्या राज्यात लागू करून घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. कायदा जर पाळला नाही तर त्याचे परिणाम होतील ते पुरवायला सरकारने तयार असावं, असे दानवे म्हणाले.