नागपूर : नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच वीज कोसळल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना नागपूरमधील कोंढाळी शिवा परिसरातील घडली. तर मराठवाड्यात शनिवारपासून पाऊस पडत आहे. पावसादरम्यान वीज कोसळून तिघाचा अस सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
विज कोसळून जखमी झालेल्या महिलांवर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अर्चना तातोडे, शारदा उईके, संगीता मुंगभाते असं मृत झालेल्या महिलांची नावं आहेत. शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये, असं हवामान विभागाने सांगितले आहे.