दिल्ली : भारतीय रेल्वे खात्यातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच होणार आहेत. रेल्वे खात्यात एकूण 1 लाख 40 हजार 640 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे.
रेल्वे मंत्रालायने विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 15 डिसेंबर 2020 ला या परीक्षा होणार असल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयारीही सुरु केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान कोरोना महामारीमुळे या परीक्षा रखडल्या होत्या. अनेक इच्छुक परीक्षा लांबल्यामुळे नाराज झाले होते. परीक्षेच्या नव्या तारखा कधी जाहीर होणार?, याची वाट सर्व ते पाहत होते. आता येत्या डिसेंबरमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतीय रेल्वेत एकूण 1,40,640 विविध पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या मेगाभरतीसाठी यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. परीक्षेसाठी एकूण 2.40 कोटी अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सर्व जागा विविध श्रेणीच्या पदांसाठी आहेत. कोरोना महामारीमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) लांबणीवर टाकावी लागली होती.
* या श्रेणींसाठी होणार परीक्षा
– 35,208 जागा बिगर तांत्रिक गट (NTPC) (गार्ड, लिपिक, क्लर्क)
– 1,663 जागा मंत्रालयीन स्तर (स्टेनो)
– 1,03,769 जागा ट्रॅकमन, पॉईंटमन