दुबई : आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा देखील सध्या युएईमध्ये आहे. आरसीबीच्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा उपस्थित असते आणि युजवेंद्रला सपोर्ट करताना दिसते. चहल धनश्रीसोबत आनंदी क्षण घालवत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धनश्री युएईमध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली असली तरी तिने डान्स करणं सोडलेलं नाही. हॉटेलच्या बाल्कनीत तिने केलेला डान्स व्हायरल होत आहे. या डॉन्सने समाजमाध्यमावर धुमाकूळ घातला आहे. अनेकजण तिची प्रशंसा करीत आहेत.
दुबईमध्ये उपस्थित असलेल्या धनश्रीने बुर्ज खलिफा येथे अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या गाण्यावर डान्स केला. ‘बुर्ज खलिफा’ ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या डान्स व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही टॅग केले आहे.