मुंबई : मुंबईतील सेक्स रॅकेटचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला आणि या संपूर्ण घटनेचा भांडाफोड केला.
यात पोलिसांनी बॉलिवूडमधील आंतरराष्ट्रीय बेली डान्सरसह दोन टीव्ही मालिकेतील अभिनेत्रींना ताब्यात घेतलं आहे. एका 5 स्टार हॉटेलमध्ये दोन मालिकांमधील अभिनेत्रींचा 10 लाखांसाठी सौदा केला जात असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राखी सावंतची मैत्रिण आणि बॉलिवूडची अभिनेत्री हिच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांच्या एका टीमला हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं होतं. ही टीम मुलींचा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भेटणार होती. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. 10 लाखांचा सौदाही पक्का झाला आणि त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी आरोपींविरोधात देहव्यापर करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलं आहे. यामध्ये राखी सावंतची मैत्रिण सापडल्यानं मोठी खळबळ उडाल्याची माहिती मिळाली आहे.
गोरेगावमधील 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर केलं आणि ग्राहक म्हणून या ठिकाणी सापळा रचला. सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.