मनीला : जगभरात कोरोनाचं थैमान त्यात आता तुर्की आणि ग्रीसमध्ये भूकंप, त्सुनामी आला आणि आता आणखी एक नैसर्गिक संकट येतं आहे. या वर्षातील जगातील सर्वात महाभयंकर वादळाचं संकट दाखवत आहे. नोव्हेंबरच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी रविवारी महाभयंकर वादळ येणार आहे. याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जगातील सर्वात महाभयंकर वादळ येणार आहे ते फिलिपीन्समध्ये उद्या रविवारी टाइफून वादळ येणार आहे. प्रशांत महासागराहून ताशी 20 किलोमीटर वेगाने पश्चिमेला सरकत असलेलं टाइफून गोनीमुळे मनीलात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे पूर येऊ शकतो आणि भूस्खनलही होऊ शकतं. जवळपास ताशी 215 किलोमीटर वेगानं हे वादळ फिलिपीन्समध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळामुळे ताशी 265 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. 2013 मध्ये जसं हाईयान टायफून वादळानं सर्वकाही उद्ध्वस्त केलं होतं, तसाच प्रकोप या वादळाचाही असेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टाइफून गोनी वादळाचा धोका लक्षात घेता प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी लुजोन बेटाच्या दक्षिणी भागाकडील हजारो नागरिकांना घर सोडण्याच्या सूचना देण्यात आला आहे.
स्थानिक आपात्कालीन अधिकारी ग्रेमिल नाज यांनी डीजेडबीबी रेडिओ स्टेशनवरून सांगितलं, की या महाभयंकर वादळाला गांभीर्याननं घ्या. कॅमरीन सर आणि कॅमरीन नोर्टे प्रांतातील किनारी भाग आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणावरील घरं रिकामी करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान एल्बेतील प्रांतीय सरकारने धोकादायक भागातील लोकांना आपली घरं सोडण्याचे आदेश दिले आहेत.
* याआधी आले होते वादळ
याआधी फिलिपीन्समध्ये 2013 साली हाईयान टाइफून आलं होतं. जे आतापर्यंतच सर्वात शक्तिशाली वादळ मानलं जात होतं. या वादळामुळे फिलिपीन्समध्ये 6,300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यातच टायफून मोलेवमुळे 22 लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक मृत्यू राजधानी मनीलाच्या दक्षिण प्रांतात झाले होते.