नवी दिल्ली : जेम्स बाँड या काल्पनिक पात्राला पडद्यावर आणणारे अभिनेते सर शॉन कॉनरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. यांनी जेम्स बाँडची भूमिका साकारून ती अजरामर केली व लोकांच्या मनात पडद्यावरचा जेम्स बाँड म्हणून कायमचं स्थान मिळवलं. त्यांच्यानंतरही अनेकांनी जेम्स बाँडची भूमिका साकारली मात्र शॉन कॉनरी हेच जेम्स बाँडच्या पात्रासाठी प्रेक्षकांच्या मनात ठसले आहेत.
जेम्स बाँड या प्रचंड प्रसिद्ध पात्राला अजरामर करणारे आणि 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका साकारणारे अभिनेते सर शॉन कॉनरी याचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. सर शॉन कॉनरी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
सर शॉन कॉनरी यांनी 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी जेम्स बॉऩ्डची भूमिका साकारली होती. यामध्ये डॉ. नो, यू अँड ओन्ली लिव्ह ट्वाईस, प्लस डायमंड्स आर फॉरेव्हर आणि नेव्हर से नेव्हर अगेन अशा चित्रपटांचा समावेश आहे. मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शॉन कॉनरी हेच पहिल्यांदा जेम्स बाँड हे पात्र रंगवताना रुपेरी पडद्यावर दिसले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली. त्याशिवाय त्यांनी पुढची अनेक दशके चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते, हे विशेष.
शॉन कॉनरी एक उत्कृष्ट अभिनेता होते त्यामुळे त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने त्यांचा मोठा चाहतावर्ग हळहळ व्यक्त करीत आहे.
* गाजलेले चित्रपट :-
मार्नी (1964), मर्डर ऑफ ओरिएंट एक्स्प्रेस (1974), दी नेम ऑफ द रोझ (1986), हायलँडर (1986), हंट फॉर रेड ऑक्टोबर (1990), ड्रॅगनहर्ट (1996), द रॉक (1996)