वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फ्लोरिडा राज्य खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला फ्लोरिडामध्ये ट्रम्प आणि बायडन यांच्या काट्याची टक्कर दिसून आली होती. परंतु, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. वर्ष 2016 मध्ये ट्रम्प यांनी या राज्यात विजय मिळवला होता.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण डाकोटा आणि उत्तर डाकोटा येथे डोनाल्ड ट्रम्प आणि कोलरॅडो आणि कनेक्टिक्ट येथे बायडन आघाडीवर आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता मतदान प्रक्रिया थांबेल. मतदान झाल्यानंतर लगेच मतगणना सुरु होणार आहे. रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्वीट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे काका इन्सिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसीसचे माजी संचालक जी बालचंद्रन यांनी जो बायडन विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. फ्लोरिडा राज्य महत्त्वाचे आहे. या राज्यात ट्रम्प यांचा पराभव झाला तर त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागेल. तिथे ट्रम्प यांना विजय मिळाला तरी बायडन यांना काहीच फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
अमेरिकेत यंदा राष्ट्रपदीपदासाठी विक्रमी मतदान झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील ओरेगन हे पाचवं राज्य आहे, जिथं 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झालं आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानादावारे आपलं मतदान केलं होतं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा आणि टेनेसी राज्यात विजय मिळवला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलँड, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना त्या चार राज्यांतून 33 मते मिळाली तर बायडन यांना सात राज्यांतून एकूण 69 मते मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिना राज्यातही विजय मिळवला आहे. येथे त्यांना 9 मते मिळाली आहेत.