रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बस आणि अवजड वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरुन जुन्या एक्सप्रेस वे वर जाताना येणाऱ्या पनवेल एक्झिटजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस ही साताऱ्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बस पुण्याहून मुंबईत येत होती. त्याचवेळी रात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती ही मुंबईतील बेस्टचे चालक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात बस चालकासह 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ IRB यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी MGM रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व जखमींवर कामोठेतील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातातील जखमींवर पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर पनवेल डेपोतील अधिकारी वर्ग रुग्णालयात उपस्थित आहे. हे सर्व जण जखमीची काळजी घेत आहेत.