मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी काल मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. त्यांनी लगेच अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. त्यांची भेट मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झाली.
योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली. योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली.
चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा कामातील ध्यास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे’, असं योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याच्या निर्णयाचं उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील कलाकारांकडून समर्थन केलं जात आहे. नव्या फिल्मसिटीच्या निर्माणामुळे हिंदी कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी काही कलाकारांनी आशा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या पावलामुळे नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, अशी अनेकांना आशा आहे.
* आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाणार
योगी आदित्यनाथ आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाणार आहेत. त्यानंतर ते दुपारी गुंतवणुकदार आणि चित्रपट निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उद्योगपतींशी चर्चा केल्यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकार परिषद घेतील.
या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिगमांशू धुलिया, जिमी शेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली होती. दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी, हिरानंदानी यांचा समावेश आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे.