अमरावती : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मात्र अमरावमतीमध्ये अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे.
अपक्ष उमेदवार किरण सरनाईक अमरावती शिक्षक मतदारसंघातून ३२४२ मतांनी विजयी झाले. किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत ३१४९, राज्यातील महाविकास आघाडी समर्थीत श्रीकांत देशपांडे यांना २२९९ तर स्वतंत्र उमेदवार शेखर भोयर यांना २०१० मते मिळाली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरनाईक हे देशपांडे यांच्यापेक्षा ८५० मतांची आघाडी घेऊन पुढे निघालेले आहेत. निवडणुकीदरम्यान फारसे चर्चेत नसलेले स्वतंत्र उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली. विद्यमान आमदार आणि मातब्बर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना त्यांनी पहिल्याच फेरीत मागे टाकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचीच सरशी झाली आहे. पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड तर पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर विजयी झाले आहेत.