सोलापूर : शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासमवेत बैठक घेऊन पाणीपुरवठा विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी केली होती. दरम्यान काल (सोमवार) रात्री उशीरा आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाणीपुरवठा विभागासाठी स्वतंत्र अधिकारी म्हणून सिध्दप्पा उस्तरगी यांची नियुक्ती केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टाकळी ते सोरेगाव दरम्यान हत्तूरजवळ पाण्याची पाइपलाइन स्थलांतरित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने काम केले. ३६ ऐवजी ५४ तास काम झाल्याने, शहरास आवश्यक असलेला पाण्याचा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत चर्चा केली.