मुंबई : सिनेसृष्टीला आणखी एक धक्का बसला असून प्रसिद्ध तमिळ टीव्ही अभिनेत्री वीजे चित्रा हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वीजे चित्रा हिच्या आत्महत्येमुळं तामिळ टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत वीजे चित्रा आढळून आली.
वीजे चित्रा रात्री २.३० च्या दरम्यान शूटिंग संपल्यानंतर हॉटेवर आली होती. तिचा होणारा पती देखील याच हॉटेलमध्ये राहत होता. पोलिसांना रवीनं दिलेल्या माहितीनुसार हॉटेलवर आल्यानंतर चित्रानं रवीला अंघोळ करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण, बराच वेळ दरवाजा न उघडल्यानं त्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीनं डुप्लीकेट चावीच्या मदतीनं तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. यानंतर तिचा मृतहेद सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत दिसला. वीजे चित्रा काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होती, त्यामुळं तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वीजे चित्राचा प्रसिद्ध उद्योगपती हेमंत रवि याच्यासोबत साखरपुडा झाला होता. पेंडियन स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील भूमिकेमुळं चित्रा घराघरांत पोहोचली होती. या मालिकेत ती मुल्लाईची भूमिका साकारत होती.