पंढरपूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा व जमीन व्यवहाराचा राग मनात धरून चक्क 40 लाखाची सुपारी देऊन खुनाचा प्लॅन आखला गेला. मात्र याचा सुगावा पोलिसांना लागला. मग पोलिसांनी त्यांचा कट रचून प्लॅनच उधळून लावला. खूनाचा हेतूने तयारीत असलेले 4 जणांना गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळीसह एका कारमधून ताब्यात घेतले आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले की, बोहाली (ता. पंढरपूर) येथील नागनाथ शिवाजी घोडके याने, माझ्या जीवितास धोका आहे. मला वाचवा म्हणून तक्रार केली होती. या तक्रारी ची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी कदम यांनी पोलिसांना शहानिशा करण्यासाठी सूचना दिल्या.
तेव्हा चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल येथे पोलीस तपासणी करत असताना एका चारचाकी गाडीत 4 जण येताना दिसले. त्यांना थांबवून अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी नळी मिळून आले. तेव्हा उपविभागीय पोलिस कार्यालय येथे आणून पोलिसी खाक्या दाखवून अधिक चौकशी केली असता त्यांनी प्लॅन कथन केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागेश घोडके बोहाली याचे आप्पा शिवाजी गोडसे (रा. कौठली ता. पंढरपूर) व संतोष कोरके यांच्याबरोबर जमिनीच्या बाबतीत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संतोष कोरके याच्या सांगण्यावरून नागेश घोडके यास मारण्यासाठीचे कटकारस्थान रचल्याचे कबूल केले. पोलिसांनी बंडू सिद्धेश्वर घोडके बोहाली, हणमंत भारत जाधव बोहाली, बंडू दामू मासाळ धायटी (ता. सांगोला), आप्पा शिवाजी गोडसे (कौठली), संतोष कोरके यांना ताब्यात घेउन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो स इ राजेंद्र गाडेकर व पथकाने केली.