सांगली : येथील एका स्पर्धा परिक्षा केंद्रात पोलीस भरतीसाठी शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर त्याच केंद्रात शिकत असलेल्या एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मनोज कांबळे (रा. खरसुंडी, ता. आटपाडी) असे संशयित आरोपीचे नाव असून पीडित मुलीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मनोज कांबळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. पीडित मुलगी गेल्या दीड वर्षांपासून या स्पर्धा परिक्षा केंद्रात पोलीस भरतीसाठी अभ्यास व सरावसाठी तीन मैत्रिणींसह एका भाड्याच्या खोलीत रहात आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी मनोजनेही त्याच केंद्रात प्रवेश घेतला होता. तो तिच्या गावचाच असल्यामुळे त्याच्याबरोबर ओळख होती. त्यानंतर त्याने प्रवेश घेतल्यावर मैत्री झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
१२ डिसेंबर रोजी मनोज याने पीडित मुलीचा फोन काढून घेतला होता. तो परत हवा असेल तर रात्री रूमवर ये असे त्याने बजावले. हा प्रकार पीडित मुलीने मैत्रिणींना व मित्रांना सांगितला. रूमवर आली नाही तर मोबाईलमधील रेकॉर्डिंग सर्वाना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. दुसऱ्या रात्री १ वाजता ती मुलगी मोबाईल आणण्यासाठी त्याच्या रूमवर गेली असता मनोजने हाताला धरून खोलीत ओढून घेत दरवाजाला आतून कुलूप लावून घेतले. त्यानंतर त्या पीडित मुलीचे जबरदस्तीने कपडे फाडून बलात्कार केला. त्याचे त्याने रेकॉर्डिंगही केले होते. त्यानंतर घडला प्रकार कुणाला सांगितला तर हे रेकॉर्डिंग मैत्रिणी, मित्र आणि तिच्या घरातील सर्वाना पाठवून देईन, असे सांगून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर ती मुलगी अंगावरील कपडे फटल्याने मनोजचाच एक टीशर्ट घालून रूमवर आली आणि घडलेला सर्व प्रकार मैत्रिणी व मित्रांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता च्या सुमारास अकॅडमीचे चालकांच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी तिला धीर देत शांत केले व सकाळी पीडित मुलीला घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी ( ता. १३) रात्री १ च्या सुमारास घडली.