चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत अभिनेते कमल हासन यांचा पक्ष मक्कल नीधि माईमही निवडणूक रिंगणात असणार आहे. इतकंच नाही, तर स्वतः कमल हासन यांनीही आपण निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चर्चा आहे.
कमल हासन यांनी स्वतः निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करतानाच लवकरच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढू याची माहिती देऊ, असंही म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी निश्चितच तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढेल याची घोषणा लवकरच करेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मदुरई क्रांतीवरुन शहराचं नाव मदुरई ठेवण्यात आलं होतं. एमएनएम पक्ष लोकांच्या हितासाठीच राजकारण करण्यावर भर देईल. आमच्या पक्षाचे तरुण घरा-घरात जाऊन लोकांच्या भेटी घेतील. आता मी बोलण्याची वेळ आली आहे. उद्याचा काळ आपला असेल. भ्रष्टाचार कुणी एक व्यक्ती संपवू शकणार नाही. नागरिकांच्या सहकार्याने नक्कीच भ्रष्टाचाराचं निर्मूलन करता येऊ शकेल. आम्ही भ्रष्टाचाराला संपवू,” असाही विश्वास कमल हासन यांनी व्यक्त केला.
* मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी बनवणार
कमल हासन यांनी यावेळी मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी करणार असल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, “एपुरुषाथलीवर एमजीआर यांचं मदुरईला तामिळनाडुची दुसरी राजधानी करण्याचं स्वप्न होतं. आम्ही हे स्वप्न पूर्ण करु. मक्कल नीधि माईम (MNM) सत्तेत आल्यास मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी केलं जाईल.”