पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरु आहे. याच वाळु वाहतुकीच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (मंगळवारी ) पहाटे पाचच्या सुमारास घडली. यामध्ये घटनास्थळीच जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रभागेच्या वाळवंटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने दुचाकी वरून जाणाऱ्या पती पत्नीला धडक दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
६५ एकर परिसरात हे जयश्री व प्रकाश बारले हे परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे दोघे नंतर त्यांच्या दुचाकीवरून नवीन दगडी पुलावरून घराकडे जात होते.
यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारे विना नंबरचे वाहन जोराने येत होते. समोरून येणार्या पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोराची होती की दोघे पन्नास ते साठ फुटापर्यंत ओढत नेले. यामध्ये जयश्री बारले जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.