नवी दिल्ली : मेसेजिंग ॲप व्हॉटसॲपने भारतात आजपासून आपल्या पेमेंट सुविधेला सुरूवात केली आहे. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक या चार बँकांच्या मदतीने व्हॉटसॲपने ही सुविधा सुरू केली आहे.
सध्या देशातील २ कोटी युझर्सना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर व्हॉटसॲपच्या पेमेंट सुविधेला नोव्हेंबर महिन्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं (NPCI) १६० बँकांच्या मदतीनं यूपीआयसह लाईव्ह जाण्याची परवानगी दिली होती. व्हॉटसॲपच्या माध्यमातून आता संदेशांसह पैसेदेखील पाठवता येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
व्हॉटसॲपच्या माध्यमातून आता आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सुरक्षितरित्या पैसे पाठवता येणार आहेत. तसंच रोख रकमेशिवाय तसंच कोणत्याही बँकेत न जाता व्हॉटसॲपच्या माध्यमातून पैसे देऊन वस्तू विकत घेताना येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.
* थेट आपल्या बँक खात्यातून ट्रान्सफर
व्हॉटसॲप पे ही सुविधा, गुगल पे, फोन पे, भीम आणि अन्य बँकांच्या ॲपप्रमाणेच युपीआयद्वारे कार्यरत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीला वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. युझर्सना थेट आपल्या बँक खात्यातून पैसे देता येणार आहेत. जेव्हा एखादा युझर या सेवेसाठी नोंदणी करेल तेव्हा व्हॉटसॲपद्वारे त्याचा एक आयडी तयार करण्यात येईल. ॲपच्या पेमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन हा आयडीदेखील पाहता येऊ शकतो. WhatsApp Payments द्वारे ज्या व्यक्तीकडे युपीआय आहे त्यांना पैसे पाठवता येणार आहे.